मलकापूर येथे ६ लाखाचा गुटखा जप्त...स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपी अटकेत...


 
मलकापूर येथे ६ लाखाचा गुटखा जप्त...स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपी अटकेत...

अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी....

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरात गुटख्याने भरलेली ओमनी कारसह आरोपीला पकडून ६ लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्याची कारवाई दिनांक १८ सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात घडली. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थावर घातलेल्या बंदीचा फज्जा उडत असून मलकापूर शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक चालू आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात ओमनी कारमधून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने. सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओम्नी कारसह एक आरोपी व त्याच्या ताब्यातून ६ लाख ३८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा आरोपी सुगंधित पान मसाल्यासह गुटखा मलकापूर शहराकडे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार मलकापूर येथे पथकाने शहर हद्दीत सापळा रचून ओमनी कार क्रमांक एम एच ०२ एवाय ५०५६ सह एका आरोपीस पकडले असून तपासांती कारमधून ५ लाख ५८ हजार ९७० रुपयांचा गुटखा व ८० हजार रुपयाची ओमनी कार जप्त करण्यात आली आहे याप्रकरणी आरोपी शेख वसीम शेख रहमान वय ४४ राहणार मलकापूर यास अटक करण्यात आली आहे आरोपीविरोधात अन्न सुरक्षा मानके २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल एजाज खान,पोलीस कॉन्स्टेबलअमोल शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल अजीस परसुवाले, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत इंगळे,चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांनी केली. पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.

Previous Post Next Post