विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला..अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडवळ बीट मधील निंभोरा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जागेमध्ये अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निंभोरा खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी दिनांक १८ सप्टेंबरच्या रात्री शासकीय जागेत ओंकार महादेव जाधव यांचे घराजवळ अनधिकृतपणे अंदाजे तीन ते चार फूट चौरस रुंदीचा तसेच सिमेंट विटांचा चबुतरा तयार करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतपणे बसवला असून त्या प्रकरणाची तक्रार दिनांक १९ सप्टेंबर रोजी निंभोरा खुर्द ग्रामपंचायत अधिकारी गणेश चोपडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने अज्ञात आरोपी विरोधात कलम ३२९ (३) भारतीय न्यायसंहितेच्या सहकलम ११ चे महाराष्ट्रात पुतळ्याचे पवित्र भंगास मंजुरी कायदा १९९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळी ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे सह पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे,बीट जमदार भागवत उबरहंडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत,पोलीस कॉन्स्टेबल हाडे यांचेसह आरसीपी जवान व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टीन शेड मध्ये बंदिस्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत .