दारू वरील १० टक्के सेल टॅक्स वाढीचा निषेध करत, परमिट रूम परवानाधारकांची बैठक...


 
दारू वरील १० टक्के सेल टॅक्स वाढीचा निषेध करत, परमिट रूम परवानाधारकांची बैठक...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील मद्यपरवाना धारकांची संग्रामपूर येथे बैठक घेतली. या बैठकीचा मुख्य उद्देश राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेल्या दारूवरील सेल्सटॅक्स (VAT) १०% वाढीचा निषेध करणे होय.मोठ्या कारखानदारांना दिल्या  जाणाऱ्या वाईन परवानाचा यावेळी विरोध करण्यात आला.बैठकीत उपस्थित परवाना धारकांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र शासन मोठ्या-मोठ्या कारखानदारांना नवे वाईन शॉप परवाने देत आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून यामुळे स्थानिक परवाना धारकांचा व्यवसाय धोक्यात येतो. शासनाने या धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा, या निर्णयाला जो सरकारने तात्पुरती इलेक्शन संपेपर्यंत स्थगिती दिली आहे ती स्थगिती न देता सरळ रद्द करावी. याच बैठकीत तालुक्यातील परवाना धारक पंकज जंगले यांच्यावर झालेल्या मारहाणीबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली गेली.बैठकीला संग्रामपूर व जळगाव जामोद येथील सुमारे 35 ते 40 परवाना धारक उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक परवाना धारक संघटना आणि उद्योगपती यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले, ज्यांनी मद्यविक्री व्यवसायाशी संबंधित अडचणींबाबत आपली तक्रार मांडली.ठरावाद्वारे सरकारकडे परवाना धारकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी करण्यात आली.काही असमाजिक कृत्य करणार्‍या समाजकंठकानच्या दादागिरीपासून परवाना धारकांचे संरक्षण व्हावे, नवे वाईन शॉप परवाने देणे थांबवावे, कारण त्यामुळे बाजारपेठेतील असमतोल वाढून कायदा-सुव्यवस्था ढासळते. सरकार मोठ्या कारखानदारांना एकाच वेळी अनेक परवाने देते. त्यातून अप्रत्यक्षपणे १०–१२ परवाने चालवले जातात. यामुळे लहान परवाना धारकांचा व्यवसाय संपुष्टात येतो. शासन महसूलवाढीच्या लालसेपोटी सतत करवाढ व नव्या परवान्यांचा वर्षाव करत आहे. त्यामुळे लहान परवाना धारकांच्या पोटावर पाय येतो आहे, असा आरोपही बैठकीत करण्यात आला.बैठकीत उपस्थित परवाना धारकांनी इशारा दिला की, शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये दुकानबंद, जिल्हास्तरीय मोर्चे आणि राज्यस्तरीय आंदोलनाचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.दारूवरील सेल्सटॅक्स वाढीवर पुनर्विचार करून ती मागे घ्यावी. अशी मागणी संग्रामपूर जळगाव जामोद तालुका परमिट रूम परवानाधारकांनी केली आहे या बैठकीला प्रेमकुमार जयस्वाल,सुषांत गावंडे,अनंता देवताळू,पांडुरंग पाटील,भगवत अवचार पाटिल ,सोनू दाताळकर,अमोल चोपडे,देवेंद्र राऊत,गजानन बोदडे,राजेश बोदडे,हिम्मतराव वानखडे,सागर मोदी,पिंटू साबे,बंडू शिरसाट,अनिकेत वानखडे,आशीष चोपडे,अनिल भोपळे,सागर मोदी,
निखिल जयस्वाल,संदीप जयस्वाल,विनोद जयस्वाल,शुभम जयस्वाल,विजय जयस्वाल,प्रशांत देवताळू उपस्थित होते.

Previous Post Next Post