पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात...घटनेचा केला निषेध...पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
त्र्यंबकेश्वरमधे पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी भ्याड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गावगुंडांवर क** कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याच्या वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनाच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथा बुक्क्या, काठ्या आणि छत्रीने हल्ला केला, ज्यामध्ये पुढारी न्युज चॅनल चे प्रतिनिधी किरण ताजणे, झी 24 तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली आहे.. या घटनेचा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जनरलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या च्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या गावगुंडांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांवर पत्रकार संरक्षण कायद्याचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. याशिवाय पत्रकारांना शस्त्र प्रमाणे उपलब्ध करून देण्याची मागणी करीत राज्यभरात संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.