जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट येथे एच आय व्ही एड्स बाबत जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम संपन्न....


 
जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट येथे एच आय व्ही  एड्स बाबत जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम संपन्न....

सुरज देशमुख/बुलढाणा....

 जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग बुलढाणा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आयसीटीसी -2 यांचे कडून आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे एच आय व्ही/एड्स बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीचा जनजागृती व समुपदेशनात्मक  कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य आर. आर. सय्यद सर तसेच पर्यवेक्षक राजपूत सर ज्येष्ठ शिक्षिका राना तब्बसुम सय्यद, एस. एस. सपकाळ व खिरोळकर मॅडम उपस्थित होत्या सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक समुपदेशक नरेंद्र सनांन्से से व लॅब टेक्निशियन सिमा देशपांडे मॅडम यांनी एचआयव्ही/एड्स या विषयावर वर्ग 9 ते 10 च्या विद्यार्थ्यांना जाणीव जागृती तसेच संक्रमणापासून स्वतःला कसे दूर ठेवावे व इतरांना या संबंधित जाणीव करून देण्यासंदर्भात सखोल महत्त्वपूर्ण जाणीव जागृती वजा समुपदेशनात्मक मार्गदर्शन केले .  समुपदेशक यांनी एच आय व्ही / एड्स बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी राष्ट्रीय एड्स निशुल्क हेल्पलाइन नंबर 1097 बाबत उपस्थित त्यांना माहिती दिली. समुपदेशकांच्या मार्गदर्शनानंतर प्राचार्य आर. आर. सय्यद  यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही संक्रमण कशा पद्धतीने रोखता येऊ शकते, "उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला " आणि अशा महारोगांबाबत समाजामध्ये आणि तरुण पिढीमध्ये  जाणीव जागृती निर्माण करण्याचे महत्त्व व काळाची गरज याविषयी अध्यक्षीय भाषणांमधून स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्होकेशनल ट्रेनर ( हेल्थ केअर ) विरेंद्र कुमार हेलोडे व व्होकेशनल ट्रेनर ( मल्टी स्किल ) मुकेश उबरंडे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक अनिल कड सर यांनी केले

Previous Post Next Post