घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नगरपरिषद मध्ये प्रथमच कृत्रिम तलाव निर्मिती... घरगुती गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा मुख्याधिकारी सुरज जाधव यांचे नागरिकांना आवाहन...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
नगरपरिषद जळगाव जामोद मार्फत जळगाव जामोद शहरात प्रथमच श्रींच्या मिरवणूक मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी प्रथमोपचार पेटी तसेच मिरवणूक मार्गाचा नकाशा व मदतीसाठी नगरपरिषद कर्मचारी प्रथमच उपलब्ध असणार आहेत. ही संकल्पना नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांची असून. तसेच जळगाव जामोद शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान १) जुना भाजी बाजार, २) चावडी जवळ एचडीएफसी बँकेजवळ, ३) दुर्गा चौक येथे मदत कक्ष उभारले असून गणेश भक्तांना कोणतीही अडचण आल्यास मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी केले आहे तसेच नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशाचे देखील सोय करण्यात आलेली आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की सर्व गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणरायाचे नगरपरिषद ने तयार केलेल्या कृत्रिम तलावात आपल्या गणरायाचे विसर्जन करावे नगरपरिषद जळगाव जामोद कार्यालयाच्या समोरील जागेमध्ये मोठा कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान सर्व गणेश भक्तांनी शांततापूर्ण वातावरणात आपल्या गणरायाला निरोप द्यायचा असून भक्तिभावाने आपल्या बाप्पाला निरोप द्यावा व शहरात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी केले आहे.