आज जळगाव जामोद शहरातील गणरायाचे विसर्जन... पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात... शहरातील काही भागात जमावबंदी लागू....
जळगाव जामोद प्रतिनिधी....
गणरायाला निरोप देण्यासाठी तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगाव जामोद शहरात पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली असून, शहरातील मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्य, मिरवणुकीत अडथळा निर्माण होईल अशी सर्व ठिकाणे खुली करण्यात आली आहेत. आज 6 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील पंधरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील गणरायाला निरोप देण्यात येणार असून याकरिता जळगाव जामोद पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त जळगाव जामोद शहरात तैनात केला असून तसेच जळगाव जामोद शहरातील मागील इतिहास पाहता वायलीवेस व तलावपुरा येथील काही भागांमध्ये जमावबंदी आदेश आज सकाळी सहा वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत लागु करण्यात आले आहेत. जळगाव जामोद शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या नेतृत्वात ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी बंदोबस्त तैनात केला असून तसेच नगरपरिषद प्रशासनाने ही घरगुती गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेमध्ये निर्माल्य कलश व कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे या ठिकाणी गावातील घरगुती गणेश विसर्जन करण्यात येणार असून मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी नागरिकांना नगरपालिकेतील कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जळगाव जामोद शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील बंदोबस्त, स्टायकिंग फोर्स, गृहरक्षक कर्मचारी, आरसीपी पथक, जळगाव जामोद शहरातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. सर्वांनी शांततापूर्ण व उत्साह पूर्ण वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप द्यावा असे आवाहन जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.