जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गाडेगांव खुर्द येथील २९ वर्षिय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दिनांक २५ सप्टेंबर रोजी घडली.त्याबाबत विवाहित महिलेच्या पतीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार २६ सप्टेंबर रोजी दिली.सविस्तर असे की ग्राम गाडेगांव खुर्द येथील विठ्ठल प्रल्हाद हिरोडकार वय ३० वर्ष हे आपल्या कुटुंबासह राहतात.दिनांक २५ सप्टेंबर च्या सकाळी विठ्ठल हिरोडकार याला पत्नी वंदना हिने फोन करून सांगितले की माझी तब्येत खराब असून मला उपचारार्थ खांडवी येथील रुग्णालयात जावयाचे आहे. व तेथून मी माहेरी पळशी झाशी येथे जाऊन मुलांना सोबत घरी घेऊन येते असे सांगितले व ती सकाळी घरून निघून गेली. सगळीकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. फोनवर संपर्क केला असता मोबाईल बंद दाखवत आहे.पत्नी वंदना हिरोडकार हिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पती विठ्ठल हीरोडकार यांनी दिनांक २६ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस यांना दिली. सदर विवाहित महिलेचा शोध जळगाव जामोद पोलीस घेत आहेत.