कृषी उत्पन्न बाजार समिती शाखेच्या सल्लागार समितीच्या सदस्य पदी श्रीकृष्ण भेलके यांची नियुक्ती...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
ग्राम आसलगांव येथील भाजप नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते असलेले श्रीकृष्ण विश्वनाथ भेलके यांची कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा आसलगावच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती दि नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नांदुरा चे अध्यक्ष यांच्या एका पत्राने करण्यात आली असून. बँकेच्या स्थानिक शाखा सल्लागार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा असला येथे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा नेते श्रीकृष्ण भेलके हे बँकेच्या प्रगती करीता आपले मोलाचे योगदान बँकेला देतील व त्यांच्या कार्यामुळे बँक प्रगतीपथावर जाईल अशी अपेक्षा किती नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक नांदुराच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपा नेते श्रीकृष्ण भेलके यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शाखा सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल आसलगाव गावकऱ्यांच्या वतीने तसेच सर्व सामाजिक स्तरातील त्यांचे अभिनंदन होत आहे.