समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण...आ.डॉ.संजय कुटे...चालठाणा येथे महाराजस्व समाधान शिबिर--जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, सेतू केंद्र, ग्रामपंचायत व पंचायत समिती, महिला व बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, समाज कल्याण अशा विविध खात्यांनी सहभाग नोंदवून शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. यामध्ये अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, ई-रेशन कार्ड, कागदपत्रांचा बटवा, विविध प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता. यावेळी आ. डॉ संजय कुटे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले वितरित करण्यात आले.यावेळी सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वला पाटील,गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी, पत्रकार ,ग्रामविकास अधिकारी जोशी, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कृषी मित्र,समस्त गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तलाठी जी.डी वाघ यांनी केले. आभार तहसीलदार पवन पाटील यांनी मानले तसेच सर्वांनी महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा असे यावेळी आव्हान केले.