जामोद येथे ईद मिला दुननबी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...


 
जामोद येथे ईद मिला दुननबी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे पैगंबर मोहम्मद सल्लाहू अललेही वसलम ईद मिला दूननबी उत्साहात साजरी करण्यात आली. पंधराशे वर्ष पूर्ण झालेल्यापैगंबर मोहम्मद सल्लाहू अललेही वसलम यांची मिरवणूक जोहरीपुरा बंगल्यापासून ते मुजावरपुरा बंगला शरीफ पर्यंत ही मिरवणूक उत्साह पूर्ण वातावरणात काढण्यात आली. यावेळी पैगंबर मोहम्मद यांचे शिकवण व विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी भावनिक व धार्मिक एक किंवा शांतता संदेश देत हे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे समापन पीर पोलाद दर्गाह शरीफ येथे करण्यात आले. या मिरवणुकीमधील लोकांना फळ वितरित करण्यात आले. यावेळी मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांचा शालू श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड,बीट जमदार शेख इरफान यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने या मिरवणुकी वेळी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान,शे. मज्जित शे.शब्बीर, साबीर खान, शेख माजित मेंबर, राजू मेकॅनिक यांच्यासह मुस्लिम धर्मीय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मिरवणूक कार्यक्रमाला सर्व हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post