उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त गजानन सोनटक्के यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार...


 
उत्कृष्ट पत्रकार  पुरस्कार प्राप्त गजानन सोनटक्के यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक ३० ऑगस्ट रोजी सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमांमध्ये एमसीएन न्यूज चे पत्रकार गजानन सोनटक्के यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.डाँ. संजय कुटे, प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी पवार, उद्घाटक उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, ठाणेदार श्रीकांत निचळ या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर पत्रकार रोजी गजानन सोनटक्के यांचा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बेग सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर व सर्व शाळेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अहिल्या न्यूज चे संपादक शिवदास सोनोणे, पत्रकार अनिल भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अस्मिता क्षिरसागर मॅडम यांनी केले. आभार शिक्षक प्रदीप वाकेकर यांनी मानले कार्यक्रमाला मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, विजय बुटे, खेरोडकार सर, गवळी मॅडम, बोंबटकर मॅडम, उमाळे मॅडम, साबे मॅडम, कर्मचारी मनोहर वानखडे, राजु अंदुरकार यांचे सह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post