बुलढाणा एलसीबीच्या टीम कडून पारखेड फाट्याजवळुन लाखोंचा गुटखा केला जप्त, एकाला अटक...


बुलढाणा एलसीबीच्या टीम कडून पारखेड फाट्याजवळुन लाखोंचा गुटखा केला जप्त, एकाला अटक...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत 25 लाख 35 हजार रुपयांचा गुटखा साठा वाहनासह जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना गुप्त माहिती मिळाली की, खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतुक होणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, बुलढाणा आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे नाकाबंदी केली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले. तपासणी दरम्यान, वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पथकाने वाहनासह 50 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रामराज दुल्हारे वय.48 वर्ष रा. फतेपुर उत्तरप्रदेश या एकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींची चौकशी करून अवैध वाहतुकीच्या मागील साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरजी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, चालक निवृत्ती पुंड यांनी केली आहे.

Previous Post Next Post