मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत ग्रामसभा निश्चित :- संदीप मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामोद...


 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत ग्रामसभा निश्चित :- संदीप मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामोद...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागा कडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सेवा पंढरवाडा अभियान सुरु करण्यात आले असून जळगाव जामोद तालुक्यातील सम्पूर्ण ग्रामपंचायती मध्ये आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कार्यशाळा सुरु असून सम्पूर्ण तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी सकाळी ८ वाजेपासून ग्रामसभांचे आयोजन सुद्धा करण्यात आले असून तालुक्यातील सुनगाव या ग्रामपंचायत मध्ये गावाचे ग्रामदैवत श्री आवजीसिद्ध महाराज मंदिर येथे येथे जळगाव जाामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ संजय कुटे यांचे मार्गदर्शन खाली व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांचे उपस्थित होणार असल्याचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी कळवले असून सम्पूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत्तीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सुद्धा या सभेला ऑनलाईन सभोधन करणार आहे, तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेवा पंधवाडा सुद्धा उद्या पासून सुरु होणार असून सम्पूर्ण तालुक्यात राबविण्यत येणार आहे..या अभियानाची सुरवात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेम्बर या कालावधीत सम्पूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून १०० गुण पत्रिकेनुसार दिलेल्या निकषाची पूर्तता ग्रामपंचायतीने केल्यास कोट्यावधीची बक्षीसे मिळणार आहेत..पंचायत समिती स्तरावरून या अभियानाची परिपूर्ण अमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला सम्पर्क अधिकारी सुद्धा नेमण्याचे बिडिंओ मोरे यांनी बोलताना सांगितले.या अभियानाची तपासणी तालुकास्तर जिल्हास्तर विभागीय स्तर राज्यस्तर असून मार्च महिन्यापर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होणार असल्याचे नियोजित आहे तपासण्यांमध्ये तालुकास्तरीय मूल्यमापन समिती जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती विभाग स्तरावर मूल्यमापन समिती राज्यस्तरावर मूल्यमापन समिती ह्या नेमण्यात आले असून दिनांक १७ सप्टेंबर पासुन संपूर्ण तालुक्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानामध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी लोकसहभागासह योगदान द्यावे तसेच येणाऱ्या १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभेला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी केले आहे.

Previous Post Next Post