स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत नगरपरिषदे च्या वतीने "स्वच्छोत्सव" महोत्सवाला सुरुवात...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
"स्वच्छता ही सेवा २०२५" हा अभियान गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार या विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून वार्षिक ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ हा सप्टेंबर महिन्यात साजरा करण्यात येतो. यंदा हा अभियान दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान देशभरात सर्वत्र राबविण्यात येणार असून या वर्षी "स्वच्छोत्सव” ही अभियानाची थीम असणार आहे. मोठ्या प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे, या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरे करणे , भारतातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी वचन बद्धतेची पुष्टी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नगर परिषद जळगाव जामोद मार्फत आज दिनांक १८/०९/२०२५ वार बुधवार रोजी जळगाव जामो शहरातील दुर्गा चौक, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट ऑफिस येथे न. प. कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.