मलकापूर जवळ ईकोचा भीषण अपघात - दोन पुरुषांसह तिन महिला एकूण पाच जण ठार , चार जखमी...भुसावळचा साजिद बागवान,चिखली ता.मुक्ताईनगर चा संतोष महाले , मृतांमध्ये चार महिलांचा समावेश....
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
मुक्ताई नगरकडून जि.जळगांव यकडून मलकापूरकडे येणाऱ्या महामार्ग क्रमांक 53 वर भानगुरा फाट्याजवळ क दि. 17 सप्टेंबर रात्री 11.15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये भुसावळ येथील साजिद अजीज बागवान (वय 30) याचा समावेश असून, तोच अपघातग्रस्त मारुती ईको कारचा चालक होता. तर एका मृतकाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती ईको कार (MH-46-EX-3120) ही मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे भरधाव वेगात येत असताना चालक साजिद अजीज बागवान याने निष्काळजीपणे वाहन चालविले.भानगुरा फाट्याजवळ आल्यानंतर त्याची कार समोर चाललेल्या एका अज्ञात मोठ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की कारचे पूर्ण चक्काचूर झाली आहे.या धडकेत चालक साजिद बागवान जागीच ठार तर संतोष तेजराव महाले वय 45 रा.चिखली ता. मुक्ताईनगर जि. जळगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कारमधील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलापैकी एकीची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.या अपघातात मृतक तानिया साजिद बागवान वय अंदाजे 28 वर्ष रा. भुसावळ, झुमा सिकंदर वय 48 वर्ष रा. भुसावळ मुळगाव नादिया,पश्चिम बंगाल तर एका मृतक महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये पंकज दिलीप गोपाळ (वय अंदाजे 22, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव)दीपिका विश्वास (वय अंदाजे 30, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) टीना अंदाजे अजय पाटील (वय 45, रा. भुसावळ) व एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (वय 22, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्यात अप क्र. 133/2025 नोंद करण्यात आला आहे.आरोपी मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध कलम 281, 106(1), 125 (b) भारतीय दंड संहिता तसेच सहकलम 184 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमराज कोळी, ठाणेदार पो.स्टे. एमआयडीसी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मपोहेकाँ नीता मारोती वाढे पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी काल रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, विभागीय महसूल अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली आहे.