निमगाव येथील ज्ञानगंगा नदी पात्रात बुडून दोन युवक बेपत्ता. गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे शोध सुरू...


 
निमगाव येथील ज्ञानगंगा नदी पात्रात बुडून दोन युवक बेपत्ता. गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे शोध सुरू... 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीपात्रातून मार्ग शोधत असलेले गावातील दोन तरुण  बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक २८ सप्टेंबर च्या दुपारी एक वाजे दरम्यान घडली आहे. संध्याकाळपर्यंत गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नदीपात्रात त्या बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेत आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून मार्ग शोधणारे निमगाव येथील दोन तरुण करण गजेंद्र भोंबळे वय १८ वर्ष व वैभव ज्ञानेश्वर फुके वय २५ वर्ष  हे बुडत असल्याचे  परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी तात्काळ नदीपात्रात उड्या घेतल्या व मदतीचा प्रयत्न केला मात्र दोन्ही तरुण बुडून बेपत्ता झाले. याबाबतची माहिती होताच सरपंच विकास इंगळे, शिवाजीराव पाटील भाजपा नेते, राजेश एकडे माजी आमदार, भगवान धांडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, यांच्यासह तालुकास्तरीय विविध राजकीय पदाधिकारी यांनी नदीपात्रात जाऊन मदत कार्याचा आढावा घेतला. पोलीस व महसूल कर्मचारी नदीपात्रा जवळ उपस्थित होते.  शिवाजीराव पाटील यांनी मानेगाव येथील पूर्णा नदीत आपत्तीत बचाव कार्य करणाऱ्या पथकाला पाचारण केले. मात्र संध्याकाळपर्यंत त्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध सुरू होता.आपत्ती व्यवस्थापन पथक पोहोचलेच नाही# दोन युवक नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याने सामाजिक कार्यकर्ते व गावकरी नदीपात्रात उड्या घेऊन त्यांचा शोध घेत होते.मात्र आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कार्यरत असलेले शासकीय पथक संध्याकाळपर्यंत ही घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीला का धावले नाही याबाबत उपस्थित नागरिक रोष व्यक्त करीत होते..

Previous Post Next Post