राशनचा ५८४ क्विट्टल तांदूळ पकडला.स्थानिक गुन्हे शाखेची जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने २८ सप्टेंबर रोजी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ५८४ क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ पकडला आहे.जळगाव जामोद नांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील नवीन पुलावर मानेगाव व गोडेगाव फाट्यावर दिनांक २८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली.यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित ट्रक त्यांच्याकडे येताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक GJ-03CU-2282 ला थांबवून तपासणी केली.त्यामध्ये २४० क्विंटल तांदूळ मिळुन आला.चौकशी अंती तांदुळाचा ट्रक जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कुरणगाड येथुन आल्याचे समजले त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक पोलीस स्टेशनला लावून कुरणगाड गाठले गोडावुन वर छापा टाकला त्यावेळी गोडावुन मध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ मिळुन आला.यावेळी पथकाने पुरवठा निरीक्षक यांच्या समवेत पंचनामा करून गोडावुन मधील तांदूळ अंदाजे ३४४ क्विंटल मोजला.दोन वेगवेगळ्या घटनास्थळावरील तांदूळ अंदाजे ५८४ क्विंटल असुन सार्वजनिक वितरण प्रणालीच्या तांदळाची किम्मत अंदाजे १७ लाख ५२ हजार असून जुन्या वापरत्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकची किंमत अंदाजे २५ लाख आहे.तसेच इतर साहित्य मिळुन ४२ लाख ९२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून आरोपी ट्रक चालक भट्टी कादर कासम वय ५५ वर्ष रा.अरब शेरी राजकोट गुजरात, वैभव सुनील आटोळे वय २५ वर्ष राहणार कुरणगाड,अंकुश आटोळे वय २३ वर्ष राहणार कुरणगाड यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे,हेड कॉन्स्टेबल जगदेव टेकाळे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश राजपूत,चालक हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.