नाली खोदकामामुळे पाणीपुरवठा पाईपलाईन नादुरुस्त..पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसापासून बंद...


 
नाली खोदकामामुळे  पाणीपुरवठा पाईपलाईन नादुरुस्त..पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसापासून बंद...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत सुनगाव यांनी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे असेच चित्र पाटील लेआउट मध्ये निदर्शनास आले आहे ग्रामपंचायतचे पाटील लेआऊट मध्ये नाली खोदकाम व बांधकाम चालू  आहे परंतु या नाली खोद कामामुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ही तुटलेलीआहे त्यामुळे या परिसरात दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झालेला आहे असे असताना अद्यापही ती पाईपलाईन नादुरुस्तच आहे ग्रामपंचायतने संपूर्णपणे आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले आहे जसे धूळ फवारणी व पिण्याचे योग्य स्वच्छ पाणी सूनगाव ग्रामपंचायत ला 140 गाव पाणीपुरवठा योजना ही नावपूर्तीच असून वास्तविक या योजनेचे पाणी सुनगाव ग्रामपंचायत ला कडून नागरिकांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही विहिरीचे बोरचे पाणी एकत्रित करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे परिसरात किडनीचे व  रोग व इतरही आजार होण्याची शक्यता आहे व तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा असे येथील नागरिकांचे मागणी आहे..

Previous Post Next Post