जळगाव जामोदमध्ये ईद मिलादुन्नबी निमित्त रिलीफ फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
ईद मिलादुन्नबीच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. वातावरण आनंदी, उत्साही आणि ऐक्याचे प्रतीक ठरले.पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगाला दिलेला मानवतेचा व शांततेचा संदेश लक्षात ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात तब्बल ५० ते ५५ दात्यांनी रक्तदान करून "सर्वांत मोठे दान म्हणजे रक्तदान" हा संदेश अधोरेखित केला.या शिबिराच्या यशामागे रिलीफ फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्तकीम मिर्जा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनत विशेषत्वाने अधोरेखित झाली. संस्थेतील प्रत्येक सदस्याने जबाबदारी पार पाडत कार्यक्रमाला यश मिळवून दिले.शिबिराच्या प्रारंभी माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी कार्यक्रम घेतल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच प्रसन्नजीत दादा पाटील (राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कार्यालय), किशोरजी केला,डॉ. वाकेकर दत्ता पाटील, प्रमोद सपकाळ, इरफान खान महादेव भालेराव, तसेच सय्यद बहाउद्दीन यांनी उपस्थित राहून या आयोजनाला गौरव मिळवून दिला.यांनी हजेरी लावून दात्यांचे मनोबल उंचावले.रिलीफ फाऊंडेशनच्या टीममध्ये काशिफ मिर्जा, साकिब मिर्जा, अतीक सर, जावेद सर, जाहिद सर, हुजैफा मिर्जा, उबेद मिर्जा यांच्यासह अनेक सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामुळे समाजात बंधुता, मानवता आणि एकतेचा सुंदर संदेश पसरला. उपस्थित मान्यवरांनी रिलीफ फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि दरवर्षी अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.