स्थानिक गुन्हे शाखेने ३ हजार २०० लिटर बायोडिझेलचा साठा पकडला..२ आरोपीसह ५ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...


 
स्थानिक गुन्हे शाखेने ३ हजार २०० लिटर बायोडिझेलचा साठा पकडला..२ आरोपीसह ५ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा धडक कारवाई करत असून अशीच एक कारवाई दिनांक २७ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दसरखेड एमआयडीसी हद्दीत एकता हॉटेल समोर हॉटेल फौजी च्या बाजूला अवैध बायोडिझेल चालकावर केली आहे. या कारवाईत ३२०० लिटर बायोडीजल किंमत २ लाख ४३ हजार २०० रुपये, साहित्य ३ लाख ४३ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अविनाश जायभाये, पीएसआय पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, हेड कॉन्स्टेबल की चांद शेख, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखा करीत असलेल्या अवैधंद्यावरील कारवाईमुळे सर्व जिल्ह्याभरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

Previous Post Next Post