श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांच्या कार्याचा गौरव...
जळगाव जामोद प्रतिनिधी.....
जळगाव जामोद परिसरातील अग्रगण्य व नावाजलेली पतसंस्था श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे अध्यक्षपदाचा तसेच संचालक पदाचा राजीनामा दिला. राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केल्यामुळे सर्वानुमते भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व नवीन संचालकांना अवगत व्हावी या उद्देशाने संचालक मंडळाने ओम प्रकाश राठी यांचा रोप्य महोत्सवी गौरव सत्कार समारंभ संस्थेचे माधव सभागृह येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वांचीत अध्यक्ष सचिन देशमुख तर सत्कारमूर्ती ओमप्रकाश राठी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ओम प्रकाश राठी यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहास सांगितला तसेच संस्थेची सुरुवात कोणत्या विपरीत परिस्थितीमध्ये संस्थेची जडण-घडन कशी झाली संस्थेचा सहकार क्षेत्रात नावलौकिक भागधारक ठेवीदार यांच्या मनात विश्वास कसा निर्माण झाला. तसेच संस्थेने विपरीत परिस्थितीमध्ये स्व मालकीची जागा विकत घेऊन त्याच जागेवर आज संस्थेचे अध्यावत अशी इमारत उभी आहे तसेच संस्थेच्या स्वमालकीची ५ एकर शेत जमीन असून त्यावर २०० मॅट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभे असून नवीन धान्य गोदाम उभारणीचा निर्णय झालेला असून त्याचे काम लवकरच सुरू होईल असे सांगितले. सर्व नवनियुक्त संचालकांनी ओमप्रकाश राठी यांना संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन तुम्ही निर्माण केलेला वटवृक्ष आणखी बहरेल याची हमी दिली. यावेळी संस्थेचे नवनिर्वांचीत अध्यक्ष सचिन देशमुख यांनी संचालक मंडळ कायम संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन संस्था उत्तरोत्तर कशी प्रगती करेल याची हमी देऊन सर्व संचालकांचे आभार मानून माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी कायम आमचे मार्गदर्शक म्हणून राहावे अशी विनंती केली. तसेच आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर उमाळे यांनी माजी अध्यक्ष यांच्या २७ वर्षाच्या कार्यकाळाला उजाळा दिला तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक संजय दंडे यांनी केले.यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे व्यवस्थापक कर्मचारी यावेळी उपस्थित होते..