अकोला जिल्हा अधिवेशनात राज्य शिक्षक संघाची ताकद प्रकट.....
सय्यद शकिल/ अकोट तालुका प्रतिनिधी....
दिनांक 28.09.2025 अकोला येथे राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले. जिल्ह्यातील विविध भागातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेची एकजूट आणि ताकद दाखवून दिली.
♦️अधिवेशनात शिक्षकांसाठी महत्त्वाचे ठराव...
अधिवेशनात शिक्षकांच्या विविध मागण्या व शैक्षणिक प्रश्नांवर ठराव मांडण्यात आले. या ठरावांना शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा दिला. “शिक्षकांच्या प्रश्नांवर अन्याय होणार नाही, हा ठाम निर्धार संघटना करते,” असे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले.
♦️दिलीप कडू यांना व्यापक पाठिंबा.....
शिक्षक निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिलीप कडू यांना अधिवेशनातून जोरदार पाठिंबा मिळाला. “शिक्षकांच्या हक्कांसाठी झगडणारा नेता म्हणून दिलीप कडू यांना संधी देणे ही काळाची गरज आहे,” असे अधिवेशनात वक्त्यांनी ठामपणे मांडले.
संघटनेतून नवचैतन्य....
या अधिवेशनाने अकोला जिल्ह्यातील शिक्षकांच्या चळवळीला नवे बळ दिले असून, संघटित शक्तीची जाणीव सर्वांना करून दिली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन निर्णायक ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
♦️कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक माजी आमदार वसंतराव खोटरे यांचे उद्गार :
“शिक्षक समाज हा प्रगतीचा पाया आहे. त्यांचा सन्मान, त्यांची मागणी आणि त्यांचे प्रश्न सोडविणे हेच आमचे कर्तव्य आहे. संघटनेची ताकद हीच शिक्षकांचा भक्कम आधार आहे.”
♦️कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजयभाऊ खोडके यांचे उद्गार :
“शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजूट गरजेची आहे. संघटनेची दिशा आणि निर्णय शिक्षकांच्या हितासाठीच असतील. ही संघटना मजबूत झाली तर शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम होईल.” त्यामुळे माझ्यासहित सर्व शिक्षकांनी शिक्षण क्षेत्र वाचवण्याकरिता दिलीप कडू यांच्या मागे ठाम उभे राहिले पाहिजे..
♦️शिक्षक मतदार संघाचे उमेदवार दिलीप कडू यांचे उदगार...
“मी माझे आयुष्य शिक्षकांसाठी लढण्यासाठी वाहिले आहे. संघटनेला सक्षम करून प्रत्येक शिक्षकाच्या प्रश्नावर आवाज उठवणे हेच माझे ध्येय आहे. तुमच्या विश्वासावर मी कधीही तडा जाऊ देणार नाही.” मी आयुष्यभर ज्ञानदानाचे काम केले. मी शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या अडचणी आहेत, तुमच्या प्रश्न नाची जाणीव मला आहेत ते प्रश्न व अडचणी मी सभागृहात ताकतीने मांडू शकतो.पाहुण्यांच्या भाषणात शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील बदल व संघटनेची भूमिका यावर सखोल चर्चा झाली.निदेशक संघटनेचे राज्य सचिव मा. मंगेश फुंडकर यांनी “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे, त्याला मिळणारा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे.” त्यामुळे अभ्यासू दिलीप कडू यांना महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो असे जाहीर केले .तर अकोला जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा. विलास वखरे सर यांनी , “संघटित ताकद हाच मोठा शस्त्र असून एकजुटीनेच आपले प्रश्न सुटू शकतात.”राज्य शिक्षक संघाच्या कामगिरीचे कौतुक करत, “ही संघटना शिक्षकांचा विश्वास जपते, त्यामुळेच आज इतक्या मोठ्या संख्येने शिक्षक येथे जमले आहेत,” असेही ते म्हणाले. त्यांनी सुद्धा उमेदवार दिलीप कडू यांच्या पाठीशी संस्थाचालक संघटना ठामपणे उभी राहील असे जाहीर केले... भाषणांनी अधिवेशनाला नवा उत्साह मिळाला तर शिक्षक चळवळीला नवे बळ मिळालेल्या भव्य अधिवेशनाच्या यशामागे जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीचा अथक परिश्रम दडलेला होता. नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था, शिक्षक बांधवांना केलेले मनःपूर्वक स्वागत आणि कार्यक्रमाची सुयोग्य आखणी यामुळे अधिवेशन संस्मरणीय ठरले.जिल्हा, शहर, व तालुका कार्यकारिणी सदस्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, प्रत्येक लहानसहान गोष्टीची काळजी घेतली. “संघटनेची ताकद ही केवळ ठरावांत नाही तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पणात आहे,” याचे जिवंत उदाहरण या अधिवेशनाने दिले.शिक्षक बांधवांनीही संघटनेच्या या प्रयत्नांचे कौतुक करत, या अधिवेशनामुळे संघटना अधिक सक्षम आणि ऊर्जावान झाल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार वसंतरावजी खोटरे,उद्घाटक सन्मा. आमदार संजय भाऊ खोडके, प्रमुख पाहुणे शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक सुरेश दादा खोटरे, राज्यशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ कडू, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सुरेंद्र जी कडू, किशोरजी देशमुख, विलास जी रोडे, अकोला जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा. विलासजी वखरे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष मा. दिलीप कडू, अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिनकरराव कडू, विनाअनुदानित संघटनेचे नेते सुधाकर वाहूरवाघ, काँग्रेसचे प्रवक्ते सुधीर ढोणे, संजय देशमुख, संदीप कुलट, अकोला जिल्हा अध्यक्ष प्रदीप थोरात, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष योगेश वानखडे, सचिव अंकुश देशमुख, गजानन मानकर, महानगर अध्यक्ष आशिष काटे, संदीप पारस्कर, उमेश रेडे, आकाश जयस्वाल, फारूक सर वजाहत अली गाजी सर जावेद अंजुम दीपक काळे, निरंजन बंड, अनंत शेळके, राजेश पाचपोर, गणेश राऊत, नितीन मानके, जाधव सर, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष प्रवीण ढोरे, संदीप बाजरे, अशोक राठोड, संतोष लकडे, गांजरे सर, प्रमोद काकडे, समाधान ढाकणे, सुनील नहाटे व अनेक राज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते...