वाळू माफीयाकडुन मागितली 20 हजाराची लाच.शेगाव तालुक्यातील 2 तलाठी एसीबीच्या जाळ्यात...


 
वाळू माफीयाकडुन मागितली 20 हजाराची लाच.शेगाव तालुक्यातील 2 तलाठी एसीबीच्या जाळ्यात...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांनी रेती वाहतूकीचे वाहने कारवाई न करता सोडून देण्याकरिता ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात संबंधिताने अॅटी करप्शन ब्युरोला कळवून दोघा तलाठ्यांना पुराव्यानिशी पकडून दिले. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो अकोलाचे पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर यांनी प्रसारमाध्यमांना कळविल्यानुसार तक्रारदार यांचा चुलतभाऊ यांची एक जेसीबी आणि एक टिप्पर तसेच इतर नातेवाईकाचे एक टिप्पर असे तीन वाहने गौण खनिजाची वाहतूक करित असतात. दिनांक १० सप्टेंबर रोजी ग्राम माटरगाव शिवाराचे तलाठी अरूण गुलाबसिंग डाबेराव (५७) रा. सावता चौक, जुने महादेवाच्या मंदिराजवळ शेगाव यांनी सदरचे खाली वाहने पकडून तिन्ही वाहने अवैध मुरूम उत्खनन करण्याकरिता जात असल्यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून सदर वाहने शेगाव तहसील कार्यालय येथे लावतो असे सांगितले. (यांनी केली सदर कारवाई सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, अकोल्याचे पोलिस उप अधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वेरुळकर, पोकॉ डिगांबर जाधव, निलेश शेगोकार, असलम शहा, गोपाल किरडे, शालु हंबर्डे व चालक सलीम खान यांनी केली.

Previous Post Next Post