शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने...आदिवासी ग्राम राजुरा गावातील नागरि समस्यांची पूर्तता...!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद शिवसेना तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या आयोजनात व नेतृत्वात जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सह संपर्कप्रमुख प्रमुख दत्ता पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते. निवेदन देतेवेळी विधानसभा संघटक भिमराव पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाईजाण ,विशाल पाटील, शेख चांद,संतोष डबे ,सुभाष माने,शेख फारुख, गजानन मांडेकर,संकेत राह टे,युवराज देशमुख, पवन पाटील, सुधीर पारवे,महादेव इंगळे, शांताराम धोटे, योगेश मनसुटे,किसन मीर गे,प्रमोद रोजतकार ,राजू गावडे शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी, आदिवासी बांधव, शिवसैनिक यांच्या उपस्थितीत संवर्ग विकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले होते की ग्रामपंचायत रसुलपूर अंतर्गत येत असलेल्या राजूरा बुद्रुक या गावामधे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी असणारा हातपंप बंद आहे, शाळेत वॉटर प्युरिफायर नाही. विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागते. शाळेत जाणारा रस्ता संपूर्ण चिखलाने माखला आहे, वरील समस्या आपण दिनांक 3 ऑक्टोबर पर्यंत सोडाव्यात अन्यथा दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती जळगाव जामोद समोर आदिवासी बांधवांना घेवून अर्धनग्न आंदोलन करू.शिवसेनेच्या आंदोलनाच्या धसक्याने पंचायत समिती प्रशासनाने याची तात्काळ दखल घेवून ग्रामपंचायत प्रशासनाला वरील समस्या तात्काळ सोडवण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्या प्रमाणे वरील तीनही समस्या सोडविल्या.नादुरुस्त हातपंप दुरुस्त करून त्यात नवीन मोटार व पाईप टाकून शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर बसवले. तसेच मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करून दिला. अशाप्रकारे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.