हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड नगरपरिषद येथील विकास मैदानात दिवाळीच्या दिवशी गरजू महिलांना साडीचोळी वितरीत करण्यात आली, दिवाळी हा सण उत्सव प्रत्येकाचा साजरा व्हावा ,दिवाळी पासून कोणीही गरजू नागरिक वंचित न रहावा हेच ध्येय अंगी ठेवून गावातील प्रतिष्ठित नागरिक, अ, भा, ग्रामीण पत्रकार संघाचे व आदर्श पत्रकार संघाचे पत्रकार, आईकुसुमाई सेवा समितीचे सदस्य,स्व. सूरजबाई शर्माचे पुत्र, सामाजिक कार्यकर्ते, यांनी एकत्र येऊन गरजूंना आपल्या कार्यातून योगदान केले.यामध्ये चिंतामणजी खिरोडकार,राजेश वानखडे, संतोष शर्मा, रमेश कवळकार, गणेश सुरजोसे, गजानन राठोड, प्रदीप पाटील, सुभाष कवळकार, सुनील कवळकार, प्रमोद निळे ,दीपक हिवराळे, सुरेश कवळकार, दर्शन खिरोडकार, सोनोने, प्रथमेश खिरोडकार, अर्जुन खिरोडकार इत्यादींनी उपस्थित राहून समाज सेवा घडविली.उपस्थित लाभार्थ्यांनी सुद्धा दानशूरांना व त्यांचा कुटुंबाला हृदय भरून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले.