एम.एच 56 रेल्वे प्रवासी संघटनेचे ना . प्रतापराव जाधव यांना निवेदन....


 एम.एच 56 रेल्वे प्रवासी संघटनेचे ना . प्रतापराव जाधव यांना निवेदन....

जळगांव जामोद प्रतिनिधी---

जळगांव जामोद- नांदुरा खामगाव मोताळा आणि संग्रामपूर येथीलएम एच 56 रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक घाणोकार  यांनी आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांना  रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्येप्रकरणी एक निवेदन देण्यात आले बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे  खासदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब यांना निवेदन देण्यात येऊन नांदुरा या ठिकाणी  गीतांजली एक्सप्रेस  या गाडीच्या थांब्यासह अनेक गाड्यांच्या स्टॉप मिळावा  याकरिता  चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष डीवरे, उपाध्यक्ष देवेंद्र रांका ;किशोर देशमुख ,विजय डवंगे ;बंडुभाऊ नालट; आतिक अहमद सर ;शिवम खंडेलवाल, संजय भुजबळ,बाळासाहेब धोरण हरिभाऊ पारस्कार तसेच जळगांव जामोद परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी सन्माननीय मंत्री महोदयांनी आस्थेने समस्या समजून घेऊन सकारात्मक चर्चा करून रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून ट्रेन थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.....

Previous Post Next Post