प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम परत सुरु करा..अन्यथा तीव्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा...


 प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम परत सुरु करा..अन्यथा तीव्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरातील सुलतानपूर येथील डॉक्टर मुन्ना शेख यांचे घरापासून ते राजा भर्तरीनाथ मंदिरापर्यंत तसेच सहित पहिलवान यांचे घरापासून ते वायलीवेस पर्यंतच्या रस्त्याच्या डाबरीकरणाची मागणी काही महिन्यापूर्वी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. पावसाळा सुरू असल्याचे कारण देत नगरपरिषद ने पावसाळा संपल्यानंतर उर्वरित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करणार असल्याचे सांगितले परंतु अद्यापही सुलतानपुरा परिसरातील उघडलेल्या रस्त्यांचे डाबरीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले नाही. याकरिता दिनांक २४ ऑक्टोबर रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात जाऊन निवेदनाद्वारे रस्त्याचे काम त्वरित करा याची आठवण देत निवेदन दिले असून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये रस्त्याचे काम सुरू न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस, तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, शेख रशीद,शेख  निजाम, असलम शहा, शेख समीर, अब्दुल साबीर यांचे सह बहुसंख्य समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post