सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहा”– मोहित दामोदर...


सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहा”– मोहित दामोदर...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

आंबेडकरी तरुणांचे प्रेरणास्थान आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य जाहीर संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा बुधवार, दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता जुने कॉटन मार्केट, नांदुरा येथे पार पडणार आहे.या ऐतिहासिक मेळाव्याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. देवाभाऊ हिवराळे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अनिल धुंदाळे राहणार आहेत.

समाजातील वंचित, मागास, तरुण, विद्यार्थी, महिला आणि आरक्षणप्रेमी वर्ग यांना एकत्र आणून नव्या समाजपरिवर्तनाचा संकल्प घेण्यासाठी हा मेळावा निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवा आघाडी, महिला आघाडी, फुले–आंबेडकर विद्वत सभा तसेच सर्व संविधानप्रेमी, आरक्षणवादी युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले आहे.मोहित दामोदर यांनी पुढे सांगितले की, “आजचा तरुण वर्ग जागृत आहे. तो फक्त बदल पाहू इच्छित नाही, तर बदल घडवू इच्छितो. सुजातदादांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प मेळावा नव्या उर्जेला दिशा देईल.”

Previous Post Next Post