राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील मनरेगा योजनेअंतर्गत तसेच घरकुल 90 मनुष्य दिन असे विविध ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड, गट निर्माण, नाला खोलीकरण, मातीकाम, आणि इतर विकासकामे पूर्ण होऊनही होळीपासून सात ते आठ महिने उलटले तरी मजुरांना मजुरी मिळाली नाही.शासनाच्या नियमांनुसार मजुरी १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे, मात्र प्रशासनाकडून हा नियम पूर्णपणे बुडाल्याचे चित्र आहे. यामुळे गावातील नागरिक रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतरित होत आहेत.राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेचे केंद्रीय संचालक राजू भास्करे यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक नितीन वऱखडे आणि तालुका महासचिव अरुण अथोटे सोबतच प्रकाश आठोले यांनी ठळकपणे सांगितले की, "शासकीय अधिकारी ज्यांना रोज ५००० रुपये रोज पगार मिळतो, त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते आंदोलन करतात; पण मजुरांना फक्त ३०० रुपये रोज मिळतात आणि त्यांनाही पैसे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत मजूर काय करावे? हा प्रश्न गंभीर आहे."गट विकास अधिकारी विनोद खेडकर साहेब यांनी दखल घेतली असून जिल्हा स्तरावर संबंधित विभागाला पत्र पाठवले आहे. त्यांनी आश्वासन दिले की, दिवाळीपर्यंत मजुरांचा पगार खात्यात जमा केला जाईल, आणि भविष्यकाळात मजुरी वेळेत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.मजुरांमध्ये नाराजी वाढत असून, जर वेळेत मजुरी देण्यात आली नाही, तर आंदोलनाची शक्यता आहे, ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर आव्हान ठरत आहे.