जळगाव जामोद प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार भरत किटे, निवडणूक लिपिक सत्यविजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या ८ गणांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये जामोद सर्वसाधारण (महिला),सुनगाव सर्वसाधारण, खेर्डा बु अनुसूचित जाती ,भेंडवळ बु नागरिकांचा मागास प्रवर्ग, आसलगाव सर्वसाधारण ,धानोरा अनुसूचित जमाती( महिला), पळशी सुपो नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला ), पिंपळगाव काळे सर्वसाधारण ( महिला ) साठी चिठ्ठी द्वारे आरक्षण काढण्यात आले.यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.पंचायत समितीच्या ८ गणासाठीचे आरक्षण श्रीराज प्रवेश सातव वय 10 वर्ष या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले. याच प्रमाणे आज 13 ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गटांचे आरक्षण काढण्यात आले आहे .जळगाव जामोद पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आले असून जळगाव जामोद तालुक्यातील ४ गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे जामोद गट अनुसूचित जमाती साठी राखीव, खेर्डा गट सर्वसाधारण साठी राखीव, पिंपळगाव काळे गट सर्वसाधारण साठी राखीव तर आसलगाव गट हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.