हिवरखेड येथील बांधकाम कामगार गुणवंत पाल्यांचा अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने गौरव...
प्रशांत भोपळे/हिवरखेड...
हिवरखेड येथील अकोला जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामकाज मजूर संघाचे पदाधिकारी व सदस्यगण यांच्या गुणवंत पाल्यांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने अकोला येथे आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले. यात विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सुस्मिता गणेश राठोड, सुरज दिपक निमकर्डे, पायल संदीप भटकर, मारिया तहसीन अब्दुल सत्तार आदींचा समावेश होता. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे टेक्नीकल व्यवस्थापक प्रकाश काळे, मार्केटिंग ऑफिसर प्रफुल वाठूरकर, पंकज मिश्रा,संजय त्रिपाठी, अंकुश चवरे,योगेश चव्हाण व बहुसंख्य बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचे हिवरखेड शाखेचे पदाधिकारी सत्यदेव तायडे व गणेश राठोड यांच्यासह इतर सदस्यगण,बांधकाम कामगार व त्यांचे पाल्य उपस्थित होते.