त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंतांना अभिवादन....


 त्रिमूर्ती कनिष्ठ  महाविद्यालयात राष्ट्रसंतांना अभिवादन.... 

जळगाव जामोद प्रतिनिधी....

राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा युनिट तर्फे राष्ट्रवंदना घेऊन आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या विद्या काटले मॅडम होत्या.

                      राष्ट्रसंतांनी आपल्या अभंगाच्या द्वारे समाजात  जनजागृती करून चैतन्य निर्माण केले. त्यामुळे समाज सुधारणे स चालला मिळाली. राष्ट्रसंतांचे जीवन म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना काटले मॅडम यांनी व्यक्त केले. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी राष्ट्रसंतांनी आपला देह झिजविला. त्याचा अंगीकार प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला हवा तरच आपली नैतिक प्रगती होईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रवींद्र निमकर्डे यांनी तर आभार प्रा. माहेश्वरी वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाला प्रा. सुप्रिया इंगळे, प्रा. योगेश वारूकार यांची उपस्थिती होती. असे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शरद गावंडे यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post