बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या मालिकेत आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मोताळा पंचायत समिती येथे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते विविध कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनक्षमता वाढविणे, श्रमबचत करणे आणि आधुनिक शेती पद्धतीचा प्रसार या उद्देशाने कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे देण्यात आली. या प्रसंगी आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख शरदचंद्र पाटील, नगरसेवक सचिन हिरोळे, तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर वाघ, युवासेना तालुकाप्रमुख मारुती कोल्हे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अंजनाताई खूपराव, मिरगे ताई, प्रवीण पाटील, सोशल मीडिया तालुकाप्रमुख गणेश राजस, गणेश चोपडे, राजू पाटील, गणेश झंवर यांच्यासह कृषी अधिकारी-कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेती विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयत्नांचे कौतुक केले.