जळगाव जा.प्रतिनिधी...
मराठा पाटील समाज सेवा समिती जळगाव जामोद, संग्रामपूर शेगांव जि बुलढाणाच्या अध्यक्षपदी अॅड बाळासाहेब भालेराव यांची निवड करण्यात आली.८ ऑक्टोबर रोजी वधूवर परिचय सम्मेलन २०२५ च्या आयोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत समाजातील नवनिर्वाचित सर्व राजकीय, सामाजीक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ पार पडला या बैठकीचे अध्यक्ष गुलाबराव मारोडे होते. सेवा समितीच्या कार्याध्यक्ष कैलास कडाळे, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव श्रीकृष्ण काळे, कोषाध्यक्ष प्रमोद अढाव आणि भाऊराव अवचार प्रसिध्दी प्रमुख भिमराव पाटिल, सचिन पाटिल, सरचिटणीस महादेवराव फाळके, विश्वासराव वरणकार, सदस्यगण रमेश पाटील, शिवाजीराव वाघ, संजु वाकडे, श्रीधर पाटिल, तुकाराम पाटिल, गटमने, रामचंद्र पाटील, अमित पाटिल, सुभाष कोकाटे, सुपडा पाटिल, शशिकांत भेंडे इत्यादी मान्यवरांची निवड बैठकीत करण्यात आली असून रवी पाचपोर तालुकाध्यक्ष जळगाव जामोद, संजय खोड तालुकाध्यक्ष संग्रामपूर, वैभव दाभाडे तालुकाध्यक्ष शेगांव यांची सुद्धा बैठकीत नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण काळे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कैलास कडाळे यांनी केले.