सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी चा जिल्हा स्तरावर सन्मान...


 सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी चा जिल्हा स्तरावर सन्मान...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जळगाव जामोद तालुक्याच्या सिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावत आपल्या सिद्धिविनायक सायंस अकॅडमिचा जिल्हास्तरावर शैक्षणिक सन्मान अल्पवधितच आपल्या उत्कृष्ट अध्यापन शैली व उत्तुंग निकालाच्या पार्श्वभूमीवर, जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी शिक्षण घेणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या Mission ZEDD योजनेचा लाभ घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांना शासनाच्या खांद्याला खांदा लावुन सत्यात उतरविण्याचे काम करणाऱ्या सिद्धिविनायक अकॅडमि ला आज बुलडाणा येथे सन्मानित करण्यात आले....आज बुलडाणा येथे जिल्हा शिक्षण गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला , 

कार्यक्रमाचे उदघाटक मा. ना. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्यमंत्री आयुष)व रक्षा ताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण ) होते तसेच प्रमुख अतिथी संजय सावकारे (वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य)  यांच्या प्रमुख उपस्थितीत  माननीय गुलाबराव खरात साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, जिल्हा परिषद, बुलढाणा) यांच्या हस्ते प्रा. अविनाश देशमुख सर यांना पुरस्कार प्रदान करून सिद्धिविनायक सायन्स अकॅडमि ला सन्मानितत करण्यात आले. त्यावेळी  गटविकास अधिकारी मोरे साहेब, इत्यादी हजर होते, सातपुड्याच्या पायथ्याशी ग्रामीण भागात केलेल्या ZEDD mission अंतर्गत शैक्षणिक कार्याबद्दल अकॅडमी चे कौतुक करण्यात आले..NMMS परीक्षेत पास झालेले व इयत्ता नववी मध्ये 85% च्या वर गुण असणाऱ्या व जेमतेम परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्याना Mission ZEDD उपाक्रमांतर्गत शासन आर्थिक मदत देऊ करत असते या मिशन मध्ये जळगाव जामोद येथील सिद्धिविनायक अकॅडमि ने शासनाच्या अटी व शर्ती मान्य करून विद्यार्थिहिता साठी उचललेल्या पावलामुळे आज अकॅडमि चा झालेला सन्मान हा आपल्या तालुक्यासाठी नक्कीच गौरव व आनंदाचा आहॆ. .. शैक्षणिक क्षेत्रतील विविध स्तरातून अकॅडमि चे कौतुक होत आहॆ.

Previous Post Next Post