बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी....
नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी मेहकर शहरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते एन सी डी आरोग्य तपासणी सुरक्षा रथ अंबुलेन्सचे लोकार्पण करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत मागील चार महिन्यांत १०,००० नागरिकांची नेत्र व गैर-संसर्गजन्य आजारांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून ३,२०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. आता पुढील १५,००० नागरिकांपर्यंत तपासणीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा आरोग्यरथ तालुक्यात फिरणार आहे.
या कार्यक्रमाला सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाढीया, दिलीपबापू देशमुख, योगेश जाधव, निरज रायमुलकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, शिवसेना-युवासेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, की “आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे.हा आरोग्यरथ उपक्रम मेहकर तालुक्यात आरोग्य जागृती व सेवा पोहोचविण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या आरोग्य तपासणी मध्ये नागरिकांनी सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी असा आवाहन त्यांनी यावेळी केले ..