जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दिनांक १७ ऑक्टोबर पासून ओम क्रिकेट क्लब आसलगाव द्वारे आयोजित क्रिकेटचे टेनिस बॉल भव्य खुल्या सामन्यांचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे करण्यात आले होते. क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचा शुभारंभ १७ ऑक्टोबर पासून २९ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आला होता. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या सामान्यांच्या अंतिम सामन्यामध्ये द्वितीय पुरस्काराचे मानकरी आसलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाडी चॅलेंजर्स ही टीम ठरली असून कर्णधार शरद वसंतराव उमरकर आणि प्रायोजक अनिल असले यांच्या मार्गदर्शनामध्ये या टिमने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. या क्रिकेटच्या खुल्या सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक कृष्णा भेलके ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक देविदास घोपे २१ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक परीक्षेत ठाकरे यांचेसह मोहन गिर्हे ११ हजार रुपये पारितोषिक वितरित करण्यात आले. या खुल्या क्रिकेट टेनिस सामन्यांमध्ये एकूण ६४ संघ सहभागी झाले होते. या ६४ संघांमधून प्रथम पारितोषिकाचे मानकरी श्री छत्रपती संघ शेगाव ३१ हजार रूपये, द्वितीय पुरस्काराचे मानकरी वाडी चॅलेंजर्स आसलगाव २१ हजार रुपये, तृतीय पुरस्काराचे मानकरी संग्राम संघ मलकापूर ११ हजार रुपये, या तीनही टीमने केलेल्या मेहनतीच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विशेषता वाडी चॅलेंजर्स या टीमचे तर लहान पासून मोठ्यांपर्यंत कौतुक होत असून या टीमला २१ हजार रुपये ट्रॉफी व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
