जळगाव जामोद प्रतिनिधी....
जिल्ह्यात गांजा व इतर तत्सम अमली पदार्थाची वाहतूक व साठवणूक विक्री करणाऱ्या समाज द्रोह्यांचा शोध घेऊन त्यांचे वर कायदेशीर कारवाई साठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून मिशन परिवर्तन दिनांक २६ जून २०२५ पासून राबविण्यात येत असून दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद तालुक्यात पहिली कारवाई करत ५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.३१ ऑक्टोबर च्या रात्री स्थानिक गुन्हे शाखा ठाणेदार सुनील अंबुलकर हे आपल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांसह पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीत गस्त करीत असताना ग्राम पळशी फाटा जवळील हॉटेल जवळ त्यांना संशयास्पद एक इसम हातामध्ये थैली घेऊन जाताना दिसला. त्याचे वर्तन संशयास्पद दिसले त्याची झडती घेतली त्यावेळी सदर इसम हा अमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतूक करताना मिळून आला.आरोपीचे नाव अक्षय तेजराव कोकाटे वय ३२ वर्षे राहणार पळशी सुपो तालुका जळगाव जामोद असुन त्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले तसेच त्याच्या ताब्यातून ५ किलो ४२ ग्रॅम गांजा किंमत अंदाजे १ लाख ८४० रुपये, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात एन. डी.पी. एस. अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अक्षय तेजराव कोकाटे यास करण्यात आली आहे. ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड-अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, शेख चाँद,गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. गजानन गोरले, चापोना. सुरेश भिसे, निवृत्ती पुंड नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, पोहेकॉ. राजु आडवे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांचे पथकाने केली.
