
चिखलदरा तालुक्यातील बामादेही येथील शंकर भुसुम यांच्या वर अस्वलीचा हल्ला...डोक्यावर गंभीर दुखापत...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या चिखलदरा तालुक्यातील बामादेही गावात शेत शिवारात जंगली अस्वलाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. दि. 6 ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता ग्रामस्थ शंकर झोले भूसूम वय 42 यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शंकर भूसूम बामादेही गंभीर जखमी झाला असून, त्यांच्या डोळ्यावर मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर चुर्णी येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले आहेत. या गंभीर जखमामुळे त्याला जिल्हा रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले.मेळघाटातील जंगली प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.मेळघाटातील जनता जंगली प्राण्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. या जंगली जनावरे पासुन मेळघाटातील नागरीक वन विभागाच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे.जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मेळघाटातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वन विभागाने तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे समजले जाते.