श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद द्वारा गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन....


 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद द्वारा गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन....

जळगाव जामोद प्रतिनिधी.....

दिनांक 10 10 2025 रोजी गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ गठन झाले व त्याचे रीतसर उद्घाटन व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई सर होते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक डॉक्टर सौ सानिका अनिल राय बी.एच.एम.एस .एमडी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली नंतर डॉक्टर सानिका राय यांनी गृह अर्थशास्त्र विभागाचे कार्यकारणी जाहीर करून रीतसर गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन झाले असे जाहीर केले. गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे अध्यक्ष- वैष्णवी ढगे, उपाध्यक्ष -दिव्या नागोराव खराटे, सचिव -कोमल भगत सहसचिव -गायत्री डबे ,प्रसिद्धी प्रमुख- रंजना सातपुते प्रसिद्धी प्रमुख -आरती विनोद बावस्कर सदस्य -निकिता वाशीमकर, अपूर्वा उगले ,हर्षा लंगोटे ,मयुरी पिसे ,सानिका भालतडक यांची निवड झाली. ही निवड करत असताना ईश्वर चिट्ठी चा उपयोग करण्यात आला. प्रसंगी राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर सर यांची उपस्थिती होती तसेच गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख अर्चना जोशी यांची उपस्थिति होती. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर सानिका अनिल राय यांनी मुलींना आरोग्य संबंधित शारीरिक व मानसिक होणारा त्रास याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका भालतडक ने केले तर प्रास्ताविक गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख जोशी मॅडम यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई सर यांनी अध्यक्षीय भाषणातून अभ्यास मंडळ काय आहे आणि कशासाठी स्थापन केले आहे याविषयी माहिती दिली तसेच सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post