जळगाव जामोद प्रतिनिधी...
मागील शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुसंस्कारातून आदर्श व्यक्तीनिर्माणाचा कार्याकरिता समर्पित असून समाजसेवेसोबत आदर्श व सुसंस्कारी पिढी घडवण्याचे कार्य संघ करीत आहे असे मौल्यवान मार्गदर्शन दि.११ ऑक्टोबरला शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक यांनी केले. जळगाव जामोद शाखेच्या विजयादशमी उत्सव व पथसंंचालन या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दि.११ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक. तर प्रमुख अतिथी म्हणून भेंडवळ मांडणीचे प्रणेते चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ, एडवोकेट गिरीश माळपांडे तालुका संघचालक व मिलिंद जोशी नगर संघचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारताने कधीच कोणत्या राष्ट्रावर आक्रमण केले नाही आपण नेहमी जगात ज्ञानाचा, विश्व कल्याणचा व विश्वशांतीचा प्रसार केला आहे. शक्ती, ज्ञान व समृद्धी या तिन्ही शक्तींची आराधना संघ शतकापासून करीत आला आहे . संघ शंभर वर्षापासून समरसता समाजात प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहे . मात्र आजही आपल्याला विषमता दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने समरसतेचा मंत्र अंगीकारला पाहिजे. आपली आदर्श कुटुंब पद्धती, आपली मातृभाषा आपली वेशभूषा व आपले पर्यावरण जपण्याचे कार्य प्रत्येक नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील संत , महंत ,संघप्रेमी महिला पुरुष व स्वयंसेवक यांची उपस्थिती लक्षवेध होती.


