जळगाव जामोद प्रतिनिधी...
सुनगांव ग्रामपंचायत लिपिक गजानन धुळे हे नेहमी च विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वरचा अधिकारी असल्याचे तोऱ्यात लिपिक गजानन धुळे नेहमी असतो.चांगल्या कामात खोडा करण्यात धन्यता मानणाऱ्या लिपिक गजानन धुळे ला वरीष्ठ अधिकारी धडा शिकवतील का असा प्रश्न सुनगांव करांना पडला आहे.जेमतेम दहावी झालेला हा लिपिक कर्मचारी आपल्या च तोऱ्यात राहतो.लिपिक असलेल्या गजानन धुळे यांच्या कार्यकाळातील सन २०१५ ते २०२० मधील गाव नमुना ८ व फेरफार नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्याचे ग्रामविकास अधिकारी जोशी यांनी सांगितले असून तसेच कर आकारणी रजिस्टर मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला असून सन २०१५ च्या नोंद समोरील रेकॉर्ड वर न घेता स्वतःच नमुना ८ च्या नोंदी केल्याच्या तक्रारी गावातील नागरिक करीत असुन लिपिक गजानन धुळे वर कित्येक नागरिकांनी पैसे खाल्याचे आरोप केले आहेत.
यासह जन्म मृत्यू दाखल्यांचे नोंदीचेही तसेच आहे.मृत्यु तारीख व नोंदणी केलेली तारीख यामध्ये कित्येक दाखल्यांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.बेजबाबदार पणे ग्रामपंचायत रेकॉर्ड वरील दाखले देताना भान न ठेवता चुकीचे दाखले ग्रामपंचायत मधुन दिल्या गेले.शिवदास सोनोने यांनी याचा जाब विचारला असता ग्रामपंचायत कार्यालयात जोरदार बाचाबाची झाल्याची चर्चा सध्या गावात रंगत आहे.या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर सरपंच रामेश्वर अंबडकार व ग्रामविकास अधिकारी हितेंद्र जोशी यांचा वचक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गटविकास अधिकारी संदीप मोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सुनगांव कडे लक्ष केंद्रित करून येथे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालावा व लिपिक गजानन धुळे यांचेवर कारवाई करत आजपर्यंत केलेल्या कामाचा हिशोब तपासून व त्यांनी केलेले गैरप्रकार बाहेर काढून सुनगांव करांना न्याय द्यावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.