सैयद शैकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट वन्यजीव विभाग, वन्यजीव परिक्षेत्र नरनाळा अंतर्गत शहानुर सफारी गेट, बोर्डी वर्तुळ येथे दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शहानुर येथे विद्यार्थ्यांना “वन, वन्यजीव व मानव संघर्ष” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 5वी ते 8वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.2 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहानुर सफारी गेट येथे गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाहानुर शाळेतील विद्यार्थी, व्याघ्र प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे नागरिकांना वन्यप्राण्यांचे संवर्धन, त्यांच्याशी सुसंवाद आणि सहअस्तित्व याबाबत संदेश देण्यात आला.
4 ऑक्टोबर 2025 रोजी मा. वनपरिक्षेत्र अधिकारी कु. हर्षाली रिठे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा मलकापूर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणाविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.6 ऑक्टोबर 2025 रोजी श्री शिवाजी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील विद्यार्थ्यांसाठी शहानुर सफारी गेट ते नरनाळा किल्ला या दरम्यान पायी जंगल भ्रमंती आयोजित करण्यात आली. या भ्रमंतीदरम्यान उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलीया (अकोट वन्यजीव विभाग) यांनी विद्यार्थ्यांना वनस्पती, पक्षी, प्राणी आणि पर्यावरणीय समतोलाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सप्ताहाचा समारोप जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शहानुर येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाने करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय होता.राहुलसिंह टोलीया (उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग),कु. हर्षाली रिठे (वनपरिक्षेत्र अधिकारी, नरनाळा),भारतभूषण अळसपुरे (वनपाल, विशेष सेवा नरनाळा),विजयसिंह गायकवाड (वनपाल, बोर्डी वर्तुळ),वनरक्षक – निलेश सांबळे, वैभव गावंडे, भावेश वाजगे, जी.एन. घडे, आर.जी. अधिकार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक दिंगाबर खडसे, सहायक अध्यापक राहुल पळसपगार व कु. राणी ढोले यांनी परिश्रम घेतले.