हिवरखेड येथे पोलिसांनी पुन्हा केला धारदार शस्त्रसाठा जप्त...
प्रशांत भोपळे/हिवरखेड...
हिवरखेड पोलिसांनी गुप्त माहितीवरून इंदिरानगर येथे रेड करून एका घरातून शस्त्रसाठा जप्त करून आरोपीस अटक केले आहे.गुप्त माहितीवरून पोलिसांनी इंदिरानगर येथील अमीर खा तस्लिम खा याने त्याच्या ताब्यातील शस्त्रे आरोपी मकसुद खा शेर खा याच्या ताब्यात दिली या महितावरून पंच यांच्या मदतीने मकसुद खा याच्या घरात रेड करून पाहनी केली असता त्याच्या घरातून 3 लोखंडी तलवारी, एक लोखंडी कोयता, दोन लोखंडी सुरे, तयार केलेले एक लोखंडी भाला असा अंदाजे १६०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करुन आरोपी विरुद्ध ४,२५ शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर कार्यवाही ठाणेदार गजानन राठोड , गोपाल गीलबिले,गणेश साबळे, प्रमोद चव्हाण , राजेश वसे, नितिन पाटिल, अश्विनी करवते, नेहा सोनवणे यांनी केली