भेंडवळ बुद्रुक येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रवरणा समारोप...


 भेंडवळ बुद्रुक येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रवरणा समारोप...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भेंडवळ बुद्रुक येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप दिनांक ७ आक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची तथा उपासकांची मार्गदर्शन झालीत.या ग्रंथ समारोपाच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर तसेच वंचित बहुजन आघाडी माजी महिला तालुकाध्यक्ष वंदना भगत यांनी मार्गदर्शन केले. सुरेश गावंडे प्रकाश गावंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला आपली उपस्थिती देखील दाखविली. ग्राम भेंडवळ बुद्रुक  येथील उपासक उपासिका आणि सहान बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे पठण ज्योती राजू जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर वंचित बहुजन महिला आघाडी माजी तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्षा तथा भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ पदाधिकारी वंदना भगत, कैलास शिरसाट, महेंद्र जाधव,अमिता रमेश जाधव, सारंगधर वाकोडे, तेजराव जाधव, धम्मपाल जाधव, दादाराव जाधव, राजु भारसाकडे, संदीप जाधव, सुरेश गावंडे, प्रमोद गावंडे, प्रदीप वानखडे, प्रकाश जवंजाळ यांच्यासह शेकडो उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post Next Post