संघाचा शताब्दी उत्सव – विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव होणार....


 संघाचा शताब्दी उत्सव – विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव होणार....

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जगातील अत्यंत प्रभावी संघटनांपैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वर्षी आपला शंभरावा वर्धापन दिन साजरा करत आहे. संघाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ विजयादशमीपासून होत असून, यानिमित्त जळगाव नगरात विशेष विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.हा उत्सव शनिवार, दि. 11 ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाची सुरुवात सायं. ६.३० वा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे होईल. यापूर्वी सायं. ४.०० वा. जळगाव जामोद शहरातील प्रमुख मार्गांवरून पूर्ण गणवेशातील भव्य पथसंचलन काढण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुंजाजी महाराज वाघ  उपस्थित राहतील, तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीधरराव गाडगे, प्रांत सहसंघचालक, मार्गदर्शन करतील.शताब्दी उत्सवात सर्व स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होतील. तसेच, शहरातील मातृशक्ती, तरुणाई आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव नगर संघचालक, मिलिंद जोशी यांनी केले आहे.

Previous Post Next Post