
किर्तन हा परम पदाप्रत नेणारा उत्तम मार्ग-ह.भ.प.जयाताई सातव..आसलगांव येथील माँ जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाचे वतीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव येथील माँ जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये दिनांक ३० सप्टेंबर रोजी देवाचे किर्तन म्हणजे देवाचे गुण पराक्रम आणि लीला यांचे वर्णन करणे तसेच भगवंतांच्या कथा पुराणातील कथा किंवा धार्मिक ग्रंथामधील कथा यांचे गायन व निरूपण केले जाते. कीर्तन हा परंपरा परत नेणारा भक्तीचा उत्तम मार्ग मानला जातो जो सर्व लोकांना आत्मज्ञान मिळवून देतो. किर्तन मुळे समाज प्रबोधन होते,कीर्तना मुळे लोकांच्या ज्ञानाचा प्रसार होतो हभप. जयाताई सातव यांचे आसलगांव येथील माँ जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन.. आसलगाव येथील माँ जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुपेश पाचपोर व नारायण चांदणे यांनी ह भ प जयाताई सातव व सर्व कीर्तनात सहभागी महाराजांचे स्वागत केले. आसलगाव येथील माँ दुर्गा उत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३० सप्टेंबर रोजी ह भ प जयताई सातव राहणार वडगाव दिघी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गायनाचार्य दीपक महाराज बारबदे, शत्रुघ्न महाराज गिर्हे, लीलाधर महाराज काळे, सुपेश महाराज मांगटे, यासह आसलगाव येथील वारकरी महिला, टाळकरी महिला बाल टाळकरी यांची उपस्थिती होती. माँ जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुपेश पाचपोर व सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला रमेश वाघ, सुरेश होणाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निलेश भेलके, प्रवीण आमोदे, चेतन गावंडे, वैभव चांदणे, विक्रम भेलके, सागर जवंजाळ, विजय महाले, श्याम मानकर, प्रमोद उद्धट यांचे सह महिला पुरुष बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.