माहिती अधिकार कायदा शासन प्रशासनावर वचक ठेवण्याचे महत्त्वपूर्ण साधन:-प्रो.डॉ. निलेश निंबाळकर...


 

माहिती अधिकार कायदा शासन प्रशासनावर वचक ठेवण्याचे महत्त्वपूर्ण साधन:-प्रो.डॉ. निलेश निंबाळकर...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयांमध्ये  विकसित भारत 2047 व स्वच्छता अभियान पंधरवडा अंतर्गत दिनांक 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन व 29 सप्टेंबर हृदय दिवस मार्गदर्शन कार्यक्रमआयोजित करण्यात  आला होता या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर निलेश निंबाळकर बोलत होते. 
माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने माहिती अधिकार कायदा- 2005 या विषयावर आयोजित व्याख्याना अंतर्गत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत असताना डॉक्टर निंबाळकर यांनी माहिती अधिकार कायद्याबद्दल सविस्तर माहिती देऊन माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचे बलस्थान  आहे असे प्रतिपादित करीत असताना माहिती अधिकार कायद्याद्वारे पारदर्शक शासन प्रशासनाच्या दृष्टीने शासन प्रशासनावर वचक ठेवल्या जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने नागरिकांच्या हातातील हे एक सशक्त साधन आहे असे स्पष्ट केले माहिती अधिकार कायद्याचा ऐतिहासिक आढावा घेत  माहिती अधिकार कायद्याचे  काय महत्त्व आहे या बाबी विद्यार्थ्यांना समजावून  माहिती अधिकार कायद्याद्वारे माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया स्पष्ट करून सांगितले  की माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोग सुद्धा समाजामध्ये होतो आहे त्याचबरोबर माहिती अधिकार कायद्यायची विद्यार्थ्यांनीओळख करून घ्यावी असे आवाहन केले..
 याच कार्यक्रमांतर्गत हृदय दिवसाच्या अनुषंगाने पोषण आहाराबाबत गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकासह अर्चना जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांनी सकस आहार करणे गरजेचे आहे त्यामुळेच आपले आरोग्य चांगले राहू शकेल आणि चांगले आरोग्य असेल तरच आपण सुदृढ राहू शकू असे स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणामध्ये  प्रोफेसर डॉक्टर प्रवीण डाबरे यांनी माहिती अधिकार कायदा व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे असे प्रतिपादन करीत असतानाच विद्यार्थ्यांनी सुदृढ आरोग्याकडे लक्ष द्यावे कारण आरोग्य सुदृढ असेल तरच आपण बाकी गोष्टी प्राप्त करू शकतो असे स्पष्ट केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कुमारी पल्लवी माकोडे हिने केले तर प्रास्ताविक प्राध्यापक विनोद बावस्कर यांनी पार पाडले कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते..

Previous Post Next Post