
तरोडा देवी संस्थान येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
तरोडा देवी संस्थान हे शिवकालीन नव्हे तर त्या अगोदर असल्याचा दावा जवळपास चे जुने जाणते लोक करतात.तरोडा येथील देवीच्या जागृत ज्योतीचं वास्तव्य येथे केव्हा झालं हे कोणीच सांगू शकत नाही, जुन्या जाणकारांना विचारणा केली असता त्यांनाही ह्याची कल्पना नाही.
तरोडा हे गाव तसं उजाड गाव.ज्या वेळेस महामारी आली होती येथील गाव दुसरीकडे जाऊन वसले.पंचक्रोशीत हे उजाड गाव उजेडात आलं ते ह्या तरोडा देवीच्या माध्यमातून जगदंबा मातेने ह्या गावाचा जणू उध्दारच केला.पुरातन काळात तरोडा देवी येथे देवीच्या दर्शनाला नदी नाल्यातून कच्च्या रस्त्यातून जाणे - येणे करावे लागत होते , दर्शनाला जाणे - येणे म्हणजे सर्व सामान्य लोकांना अगदी कठीण प्रसंगांना तोंड देत जावं लागतं होत जणू काही देवी आपली परीक्षाच घेत आहे की काय ? अशी मनात शंका उत्पन्न करून जायची.अतिशय जागृत असं हे ठिकाण असून इथून जळगांव जामोद , सुनगाव , खेरडा , उसरा आणि निंभोरा असे पांच ही गावं सुमारे तीन किलोमीटर च्या अंतरावर आहेत हे विशेष.हे संस्थान जरी जागृत होते तरी लोकाभिमुख होऊन शकत नव्हतं त्यासाठी येशील जाणे - येण्यासाठील लोकांचा जास्तीत जास्त कल दर्शनासाठी कसा येईल ह्या उद्देशाने दरवर्षी नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय उत्साहात साजरे होऊ लागले.
परंतु ह्या नवरात्रोत्सव ला नवीन ऊर्जा,ताकत लाभली ती संस्थानच्या जिर्णोद्धाराने.
तरोडा देवी संस्थान चा जिर्णोद्धार झाला तो २०२२- २०२३ ला ज्यावेळेस काही तरुण मंडळी एकत्र येऊन आ.संजय कुटे यांच्याकडे जातात सभामंडप आणि सामाजीक सभागृहाच्या मागणीला दुजोरा मिळवून बांधकाम पूर्णत्वास आणतात , तेव्हा कुठं ह्या संस्थानाला जणू नवी ऊर्जा प्राप्त , नवा उत्साह ,नवी चेतना प्राप्त झाली.आज ह्या संस्थानला दर्शनासाठी येणं अजून सोपं झालं जळगांव जामोद- सुनगाव रस्त्यावर निलकंठेश्वर मंदिरापडून तर थेट तरोडा देवी संस्थान पर्यंत सुमारे ३ किलोमीटर लांब असा डांबरी रस्ता देवीच्या कृपेने आणि या तरुण मंडळी च्या प्रयत्नाने शक्य झाला.ह्या नवरात्रात नऊ दिवस उत्साहात , आनंदात साजरे करतांना सर्व भाविक भक्तांची खरचं उत्तम सोय होत आहे हे विशेष.आणि हे शक्य झालं ते तरोडा देवी संस्थान च्या तरुण सेवा मंडळीच्या अथक परिश्रमातून.भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं अशी भावना जण माणसात तयार झाली आहे.